Vitamin Protein Breakfast Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये विटामिन, प्रोटीन हेल्दी नास्ता कसा तयार करता येईल हे पाहू
उत्तम आरोग्य राहावे यासाठी आपण वेगवेगळे डाईट प्लॅन तयार करतो सकाळ चा सुंदर हेल्दी नास्ता दुपार चे जेवण आणि रात्रीचे जेवण या मध्ये वेगवेगळे ड्रायफूट, फूड ज्युस, सलाद, यांची मदत घेतल्या जाते.
विशेषतः सकाळ च्या वेळेस जठर अग्नी जास्त प्रज्वलीत असते प्रचन शक्ति छान असते अशा वेळी प्रोटीन विटामिन युक्त हेल्दी नास्ता मिळाला तर आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल
यावेळी तांदूळ पीठ आणि वेगवेगळया आवडीचा भाजीपाला यांचे मिश्रण करुन हेल्दी नास्ता तयार करू पचायला हलका आणि विटामिन प्रोटीन युक्त आरोग्यास उत्तम.
![]() |
| Vitamin Protein Breakfast Recipe Marathi |
Vitamin Protein Breakfast Recipe Marathi
तांदूळ चे पीठ 2 वाटी
गाजर 1
पालक 1 वाटी
कांदा 1
हिंग 1 चिमट
मसाला 1/2 चमच
जिरे 1 चमच
हिरवी मिरची 4 / 5
कडिपत्ता पाने 5
ओल खोबरं 3 चमच
कोथिंबिर
चवीनुसार मीठ
Vitamin Protein Breakfast Recipe
पाककृती : -
तांदूळ स्वच्छ धूवुन 2 तास भिजत घाला त्यानंतर चाळणी किंवा सुती कापडावर सुकवा 'Vitamin Protein Breakfast Recipe Marathi'
सुकलेले तांदूळ मिक्सर मध्ये बारिक पीठ तयार करा मिक्सर ला बारिक पीठ झाले तर बरं नाही तर गिरणी मधून दळून आणावेत
एका बाऊल मध्ये तांदूळ पीठ घ्या त्यात आपण ज्या भाज्या वापरत आहे त्या बारिक चिरून घ्या किंवा किसुन बाऊल मध्ये घाला
Vitamin Protein Breakfast
1/2 चमच जिरे, 2 चिमट हिंग, हिरवी मिरची बारिक चिरलेली, गरम मसाल 1/2 चमच, कडिपत्ताचे पाने, कोथिंबिर बारिक चिरून, ओलं खोबरं किसुन घेतलेलं हाताने सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून थोडसं पाणी साह्याने मध्यम घट्ट भिजवा त्यात एक च्या तेल घालून मिश्रण मळून घ्या 10 ते 15 मिनिट झाकूण ठेवा
पोळपाट वर ओला रुमाल ठेवा त्यावर मळून ठेवलेल्या तांदूळचे मिश्रण मधील एक गोळा घ्या, हाताला थोडं तेल लावा पाहिजे तसा पातळ थालीपीठ सारखा हाताने गोलवर थापून घ्या Vitamin Protein Breakfast Recipe Marathi
ग्रॅस वर पॅन मध्यम फेल्म वर ठेवून घ्या पॅन गरम झाला त्यावर 1 चमच तेल गोलवर फेलवा तयार पराठा पॅनमध्ये हळूवाळ ठेवून रुमाल अलगद काढून घ्या
मेदू वडा रेसिपी, नानखटाई रेसिपी चा आनंद घ्या
पराठा वर गोलवर चमच तेल टाका थोडा बाऊण झाला की परतुन घ्या दोन्ही बाजु व्यवस्थीत भाजुन घ्या
गरमगरम तयार आहे तांदूळ पीठ आणि भाज्यांच्या सममिश्रण करुन तयार विटामिन प्रोटीन युक्त पराठा टोमॅटो चटणी सोबत लाल चटणी आणि ओल्या खोबऱ्या च्या चटणी सोबत सर्व्ह करा
"Vitamin Protein Breakfast Recipe Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये विटामिन प्रोटीन हेल्दी नास्ता विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
विटामिन प्रोटीन हेल्दी नास्ता या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
टेस्टी पास्ता रेसिपी, डाळ ढोकळी, पनीर पराठा रेसिपी आपल्या नास्ता साठी खास
रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद



