Idli Sambar Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये इडली सांबर कसा तयार करता येईल हे पाहू
इडली सांबर चे नाव आठवले तर आपल्याला दक्षिण भारतीय व्यंजन आठवते पण इडली सांबर सर्वांन ची आवडती डिश बनली आहे लहान मुलांन पासुन तर वयोवृध्दा पर्यत सर्वांना आवडते पचायला हलकी मऊ लुसलूसीत अशी इडली सांबर विषयी माहिती घेवू चला रूपेरी रेसिपी मध्ये
![]() |
| No.1 Idli Sambar Recipe In Marathi |
No.1 Idli Sambar Recipe In Marathi
इडली सांबर साहित्य : -
- तांदूळ ३ कप
- उडिद दाळ १ कप
- पोहे १ / २ कप
- मेथीदाने १ / २ चमच
- मीठ चवीनुसार
No.1 Idli Sambar Recipe
पाककृती : -
- तांदूळ उडिद दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
- तांदूळ उडिद दाळ वेगवेगळी बाऊल मध्ये ८ ते १० तास भिजत घाला किंवा रात्रभर भिजु द्या
- तांदूळ भिजवतांना त्या मध्ये १ / २ चमचा मेथीदाने टाका इडली मऊ होते
- तांदूळ उडिद दाळ भिजल्या नंतर त्याची पेस्ट तयार करा
- १ / २ कप पोहे धुवून घ्या आणि १० मि. भिजत ठेवा तांदूळ सोबत पेस्ट करा 'No.1 Idli Sambar Recipe In Marathi'
- तांदूळ ची पेस्ट जाडसर काढा दोन्ही पेस्ट एकत्र करून ७ ते ८ तास आंबण्यासाठी ठेवा त्यात १/२ चमच खायचा सोडा टाकून मिस्क करा
- घरातील उष्ण भागात ठेवा म्हणजे आंबण्याची प्रक्रिया छान होईल
- बेटर तयार झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आवश्यक असेल तर इनो पण घेवू शकता
- बेटरला एका बाऊलमध्ये घ्या मोठ्या चमचाने छान फेटून घ्या
- गॅसवर इडली कुकर ठेवा त्यात पाणी टाका पाणी गरम होई पर्यत इडली प्लेट ला ब्रश ने किंवा हाताने तेल लावा इडली चिकटणार नाही
- इडली प्लेट मध्ये एकसारखे प्रमाणात बेटर टाकून घ्या
- इडली कुकरमध्ये पाणी गरम झाले की त्यात सर्व इडली प्लेट ठेवा
- इडली कुकरला झाकण लावून १० मिनीट होवू द्या
- १० मिनीट नंतर ग्रॅस कमी करा झाकण उघडून घ्या
- चमच च्या साह्याने इडलीला टोचून पहा चमचला जर काही मिश्रण चिकटले नाही तर इडली छान शिजली समजा थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवा .
- अशा रितीने आपली इडली तयार झाली .
इडली सोबत लागणारा सांबर तयार करू
साहित्य : -
- तुर डाळ १ वाटी
- टोमॅटो २
- कांदा १
- बटाटा १
- वांग १
- चिंच ४
- तेल
- गांजर १
- हळद १ / २ चमच
- जिरे १ / २ चमच
- मोहरी १ / २ चमच
- शेवग्याच्या शेंगा २
- सुकी लाल मिरची ३ / ४
- लवकी चे काप ४ /५
- सांबर मसाला १ चमच
- लाल मिरची पावडर २ चमचे
- कडीपत्ता ७ / ८
- कोथिंबीर
पाककृती : -
- तुर दाळ धुवून कुकर ३ शिट्टी होत पर्यत शिजू द्या
- तोपर्यत भाजी तयार करू गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवा
- त्यात ३ चमच तेल टाका तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी तडतडू द्या
- त्यात कडिपत्ता थोडा लाल मिरची टाका त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाका.
वेज दम बिर्याणी चाा स्वाद घ्या
- कांदा थोडा बाऊण होवू द्या आलं लसन पेस्ट थोडा वेळ होवू द्या.
- नंतर त्यात हळद ,लाल मिरची पावडर टोमॅटो, लवकी चे काप , बटाटा, गांजर, शेवग्याच्या शेंगा साधारण चिरून घ्या
- आवडत असेल तर चिरलेल वांग टाकून थोडा वेळ शिजु द्या .

- अर्धा चमच हिंग टाका
- सांबर मसाला टाका चिंच ला थोडा वेळ भिजत ठेवा
- नंतर त्याचे पाणी भाजीत टाका त्यामुळे थोडीशी सांबरला आंबट चव येईल
- आवश्यक असल्यास थोडा गुळ टाका काही वेळ झाकूण शिजू द्या No.1 Idli Sambar Recipe In Marathi
- कुकर मध्ये शिजलेली दाळ थोडी घोटून घ्या नंतर भाजीमध्ये टाका त्यात आवश्यक तेवढे पाणी टाका उकळी येई पर्यत होवू द्या
- त्यात कोथिंबिर टाका आपला सांबर तयार झाला
इडली सोबत लागणारी चटणी
साहित्य : -
- ओलं खोबरं १ वाटी
- जिरे १ चमच
- मोहरी १ चमच
- आलं लसनं पेस्ट १ / २ चमच
- हिरवी मिरची ३ / ४
- कडीपत्ता ४ / ५
- सुकी लाल मिरची २
- मिठ चवीनुसार
- तेल आवश्यक तेवढे
पाककृती : -
- ओलं खोबर ,जिरे ,हिरवी मिरच्या,मिक्सर मध्ये
- बारिक करून घ्या त्यामध्ये निंबूचा रस टाका.
- एका बाऊलमध्ये ते मिश्रण काढून घ्या
- गॅस वर छोटा आकाराचा पॅन गरम होण्यासाठी ठेवा
- पॅन गरम झाला की २ चमचे तेल टाका तेल गरम झाले
- गॅस कमी करा त्यामध्ये मोहरी कढीपत्ता
- थोडा हिंग लाल मिरची थोडावेळ होऊ द्या
- त्यानंतर बाऊलमध्ये असलेल्या मिश्रण ला तडका द्या
- तडका देल्याने चटणी चविष्ट स्वादिष्ट होईल
१ ) इडली साठी तांदूळ किती वेळ भिजवावे ?
इडलीसाठी लागणारा तांदूळ पाण्यानी २/३ वेळा स्वच्छ धुवून घ्या ८ ते १० तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
२ ) इडली मऊ होण्यासाठी काय करावे ?
इडली मऊ होण्यासाठी तांदूळ भिजत घालतो त्या वेळस त्यात १ / २ चमचा मेथीदाने टाकावे आणि अर्धी वाटी पोहे १० मि .भिजवावे आणि तांदूळ सोबत मिस्कर मध्ये पेस्ट तयार करा इडली मऊ जाळीदार होईल.
३ )इडली पीठाला लवकर आंबवायाचे कसे ?
इडली पीठाला गरम उबदार जागी झाकून ठेवा
इडली पीठामध्ये बेकिंग सोडा टाका त्यामुळे त्याची आंबण्याची प्रक्रिया चांगली होईल .
रुपेरी रेसिपी मध्ये इडली सांबर या विषयी माहिती पहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
इडली सांबर या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
रूपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडली असल्यास Comment करा Share आवश्य करा .











