Batata Vada Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये बटाटा वडा कसा तयार करता येईल हे पाहू
पोटाची भुक शांत करण्यासाठी आपण नास्ता करतो नास्ता जर झणझणीत असेल तर आनंद होतो
बटाटे पासुन वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन तयार करता येते जसे समोसे, बटाटा पराठा, पावभाजी अनेक नवनवीन व्यंजना मध्ये बटाटा वापरल्या जातो
आपण बटाटा पासुन बटाटा वडा तयार कसा होतो
या विषयी माहिती घेवूया चला तर रूपेरी रेसिपी मध्ये बघू बटाटा वडा कसा तयार होतो
![]() |
| Batata Vada Recipe Marathi |
बटाटा वडा साठी लागणारे साहित्य : -
Batata Vada Ingredients :-
बटाटे 6
बेसन 200 ग्रॅम
कांदे 2
हिरवी मिरची 8
लसन कळी 8
खायचा सोडा 1/2 चमच
हिंग 1 चिमूट
अद्रक 1 इंच
जिरे 1 चमच
हळद 1 चमच
कडीपत्ता 10
धने 2 चमच
गरम मसाला 1 चमच
लिंबू चा रस 1 चमच
मीठ चवीनुसार
तेल आवश्यक तेवढे
कोथिंबिर
Batata Vada Recipe
बटाटा वडा ची पाककृती : -
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या ग्रॅसच्या मंद आचेवर कुकर मध्ये तीन चार शिट्टी होवू द्या
कुकर थंड झाला की बटाटे काढून थंड करून सोलून घ्या 'Batata Vada Recipe Marathi'
सोलून ठेवलेले बटाटे एका बाऊल मध्ये घ्या हाताने हलकेसे अर्धवट मॅश करून घ्या
बटाटा चा मसाला तयार करण्यासाठी ग्रॅस वर पॅन ठेवा 2 चमच तेल टाका
तेल गरम झाले की त्यात 1 चमच मोहरी तडतडू द्या मुंग डाळ 2 चमचे,कडीपत्ता चे पाने टाका हिरवी मिरची चा ठेचा तयार करुन पॅनमध्ये घाला
उभा बारिक चिरलेला कांदा टाका कांदा छान बाऊन होऊ द्या
1/2 चमच कमी हिंग टाका, 1 इंच अद्रक बारिक कापून किंवा अद्रक पेस्ट टाका 1/2 चमच हळद टाकून परतुन घ्या
Batata Vada
अर्धवट मॅश केलेले बटाटे त्यात टाकून परतुन घ्या
काही वेळ मंद आचे वर ठेवा चवीनुसार मीठ टाका बारिक चिरलेला कोथिंबिर टाका आणि बाजुला उचलून ठेवा थंड होवू द्या
एका बाऊल मध्ये 200 ग्रॅम बेसन घ्या त्यात अर्धा चमच पेक्षा कमी खायचा सोडा घाला चवीनुसार मीठ घालून घ्या थोड थोड पाणी टाकून बेसन मिक्स करून घ्या बेसन जास्त घट्ट किंवा पतले होणार नाही यावर लक्ष ठेवा बेसन मध्यम पातळ बनवा
थंड झालेल्या बटाटा मसाला चे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या Batata Vada Recipe Marathi
ग्रॅस वर पॅन ठेवा वडे तळण्यासाठी तेल आवश्यक तेवढे तेल गरम होवू द्या तेल गरम झाले की ग्रॅस मंद करा
बटाटा चे गोळे बाऊल मधील बेसन मध्ये स्टफिंग करून घ्या बटाटाच्या गोळ्याला बेसन चे बॅटर गोलवर व्यवस्थित लावा आणि पॅन मध्ये एक एक करून हळूवाळ सोडा
वडे बाऊण झाले की पलटवून घ्या वडे पूर्ण पणे बाऊण झाले की बाहेर काढून घ्या
गरमागरम बटाटे वडे एका डिशमध्ये टिशु पेपर वर ठेवा
हिरवी मिरची मध्य भागातुन उभी कट देवून आवश्यक तेवढी तळून घ्या
"Batata Vada Recipe Marathi"
गरमागरम बटाटा वडे सोबत लाल चटणी, हिरवी चटणी, शेंगदाने ची सुकी चटणी, टोमॅटो सॉस, दही किंवा ताक पासुन तयार केलेली कडी, कट म्हणजे रस्सा या सोबत स्वाद घ्या
रुपेरी रेसिपी मध्ये आपण बटाटा वडा या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
बटाटा वडा या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा
रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडल्यास निश्चित Comment करा आणि Share करायला विसरू नका

