![]() |
| Paneer Paratha Recipe Marathi |
Paneer Paratha Ingredients :-
पनीर 200 ग्रॅम
गव्हाचे पीठ 2 वाटी
बटर 2 चमचे
हिरवी मिरची 2
धने पावडर 1/2 चमच
गरम मसाला 1/2 चमच
अद्रक लसन पेस्ट 1/2 चमच
लाल मिरची पावडर 1/2 चमच
तेल आवश्यक तेवढे
मीठ चवीनुसार
कोथिंबिर
Paneer Paratha Recipe
पाककृती :=>
एका बाऊल मध्ये प्रथम पनीर बारिक किसुन घ्या पनीर प्रेश असेल तर टेस्ट छान असते
किसलेल्या पनीर मध्ये 1/2 चमच लाल मिरची पावडर, 1/2 चमच हळद, 2 हिरवी मिरची, 1 चमच धने पावडर, 1/2 चमच आमचूर पावडर, कोथिंबिर चवीनुसार मीठ मिक्स करुन घ्या पराठातील साराण (स्टफींग ) तयार होईल
हिरवी मिरची, अद्रकलसन, कोथिंबिर यांची पेस्ट करून वापरली तर फार छान होईल
एका बाऊल मध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ 1 चमच तेल मिक्स करुन कोमट किंवा साधारण असलेले पाणी मिक्स करून पीठ मळून मध्यम डो तयार करा
गव्हाच्या पीठाच्या तयार डो ला तेल लावून 20 मिनिटे झाकून ठेवा मुलायम होईल 'Paneer Paratha Recipe Marathi'
पीठ च्या तयार डो चे गोळे तयार करुन त्याची लहान जाडसर चपाती लाटून घ्या त्यावर 2 चमचे पनीर चे सारण ठेवा
Paneer Paratha
पुरण पोळी सारखे किंवा सारण च्या वरच्या दिशेने चपाती गोळा करा त्यामुळे सारण आत बंद होईल त्याचा गोल गोळा करुन हलकासा दाब देवून हलका हाताने गोलाकार पराठा तयार करा
किंवा गोळ्याची वाटी तयार करून त्यात सारण ठेवा आणि हलकेचे सारण दाबून वाटी बंद करून पीठाचे घोळण लावून हलक्या हाताने पराठा दाबून तयार करा त्यामुळे सारण पूर्ण पसरेल नंतर जेवढा पाहिजे तेवढा पराठा गोलाकार लाटून घ्या Paneer Paratha Recipe Marathi
पराठा गोलाकार लाटतांना गव्हाच्या पीठाची मदत घेवू
गॅस वर पॅन मध्यम प्लेम वर गरम होवू द्या पॅनमध्ये पराठा भाजण्या साठी तेल गोलवर फेलवून त्यावर पराठा हळूवाळ पणे ठेवा थोडा ब्राऊण झाला की त्यावर कडेने तेल गोलवर सोडा आणि पलटवून घ्या
थोडा ब्राऊण होवू द्या नंतर डिश वर काढून घ्या
डिश मध्ये गरमागरम पराठा सोबत टोमॅटो सॉस, बटर, हिरवी चटणी, शेंगदाची चटणी, लाल चटणी आपल्या आवडीचे लोणचे, फ्राय केलेले दही, ओल्या खोबऱ्याची चटणी सोबत सर्व्ह करा
"Paneer Paratha Recipe Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये पनीर पराठा या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
पनीर पराठा या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
टिप : - 👇
पनीर हेल्दी करण्यासाठी पनीर सोबत बटाटा शिजवून मॅश करुन वापरू शकता
पराठयाची टेस्ट वाढवण्यासाठी गरम मसाला, आमचूर पावडर वापरू शकता
आवडीनुसार बारिक चिरलेला कांदा वापरू शकता

