Momoj Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये मोमोज कसा तयार करता येईल हे पाहू
मोमोज मनमोहक सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारे जसे मोदक प्रमाणे दिसणारे पण गोड नाही जरा वेगळी टेस्ट देणारे सर्वांना आवडणारे मोमोज तयार होते तरी कसे चला बघूया रूपेरी रेसिपीमध्ये
![]() |
| Momoj Recipe In Marathi |
Momoj Recipe In Marathi
मोमोज साठी लागणारी साहित्य : -
मैदा 2 वाटी
मीठ 1 / 2 चमच
तेल 2 चमचे
Momoj Recipe
पाककला : -
एका बाऊल मध्ये 2 वाटी मैदा घ्या 1/2 चमच मीठ
आणि त्यात 2 चमचे तेल टाका आणि मिक्स करा
आवश्यक थोड थोड पाणी टाकून मैदा घट्ट मळून घ्या
मैदाच्या गोळयाला 1 चमच तेल लावून काही वेळ साठी झाकून ठेवा 'Momoj Recipe In Marathi'
एका डिशमध्ये स्टपिंग चे सर्व साहित्य काढून घेऊ
बारिक किसलेली पत्ता कोबी 2 वाटी
बारिक चिरलेली शिमला मिरची 1/2 वाटी
बारिक चिरलेला कांदा 1
बारीक चिरलेली हिरवी मिरची 4
बारीक चिरलेले गांजर 1
बारिक चिरलेले अद्रक 1 इंच
काळे मिरे पावडर 1/2 चमच
सोयासॉस 1 चमच
आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या घेऊ शकता
Momoj
गॅसवर एक कढई मोठया ऑच वर ठेवा 2 ते 3 चमचे तेल कढईत सर्वाकडे गोल फिरवा गरम होवू द्या
बारिक चिरलेली लसन कळी टाका त्यांनतर बारिक चिरलेले अद्रक टाका बारिक हिरवी मिरची टाकून थोडा वेळ परतुन घ्या
बारिक चिरलेल कांदा, किसलेली पत्ता कोबी, बारिक किसलेल गांजर , बारिक चिरलेली शिमला मिरची टाका 1/2 चमच काळे मिरे पावडर टाकावेत
गॅस मोठया आचेवर राहू द्या आणि सर्व भाज्या परतुन घ्या त्यात 1 चमचा सोयासॉस टाका आणि परतवा
गॅस ची आच मोठी असल्यामुळे भाज्या ओलसर मऊ होणार नाही भाज्या हया कोरडया क्रिप्सी होईल
त्यामुळे मोमोज चे स्टपिंग व्यवस्थित मोकळे होईल त्यात बारिक चिरलेले कोथिंबिर टाका
स्टपिंग तयार झाले आता आपण मोमोज तयार करून घेऊया Momoj Recipe In Marathi
भिजलेल्या मैदयाचे एकसारखे गोळे तयार करून घेऊ गोळ्याला सुकामैदा लावून पुरी लाटून घेऊ पुऱ्या ह्या जास्त पातळ किंवा जाड लाटू नये पोळी (चपाती ) सारखी मध्यम अशा जाडसर असाव्यात छोटया आकाराच्या पुऱ्या लाटून घेऊ करंजी बनवतो त्याप्रमाणे तयार करू
पुऱ्या वर तयार असलेलं मोमोजचं स्टपिंग ठेवा जसे आपण मोदक तयार करतो त्याप्रमाणे पाकळ्या तयार करुन वरचा बाजूला पिळा द्या मोमोज पहायला छान दिसेल अशा प्रकारे मोमोज तयार करू
मोमोज वाफवण्यासाठी गॅस वर कढई ठेऊन त्यात पाणी गरम होऊ द्या
आपण ढोकळे जसे वाफवतो तसे मोमोज वाफवून घेवू
कढई पाणी गरम झाले की त्यात एक जाळी किंवा उलट छोटी प्लेट ठेवा एका मोठया प्लेट ला सर्व कडे तेल लावून घ्या (मोमोज चिपकणार नाही ) प्लेटमध्ये सर्व मोमोज ठेवून प्लेट कढई मध्ये ठेवा आणि वरुन झाकन ठेवा 10मी. वाफून घेऊ
10 मी वाफवून झाल्यावर गॅस कमी करा प्लेट बाहेर काढून थंड होवू द्या
मोमोज सोबत लागणारी टेस्टी लाल चटणी एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी उकळण्या साठी ठेवा पाणी ला उकळी आली की त्यामध्ये 4 टोमॅटो, 4 लाल मिरची, आणि 5/6 लसन कळी टाका 15 मी शिजवा
शिजलेले टोमॅटो मिरची थंड होवू द्या आणि मिक्सर पॉट मध्ये फिरवून घ्या
चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घाला चटणी तयार होईल
एका डिशमध्ये सर्व मोमोज ठेवा आणि तयार चटणी सोबत सर्व्ह करा
"Momoj Recipe In Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये मोमोज या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
मोमोज या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडल्यास निश्चित Comment करा आणि Share करायला विसरू नका

