खमंग ढोकला रेसिपी मराठी Dhokla Recipe In Marathi

Dhokla Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये खमंग ढोकला कसा तयार करता येईल हे पाहू

मोहरी, कडिपत्ता, हिरवी मिरची ने सुंदर सजलेला सर्वाना आपल्याकडे आकर्षित करून घेणारा खमंग ढोकळा हा होतो तरी तयार कसा तांदूळ व चनादाळ या पासून तयार होणारा ढोकळा या विषयी माहिती घेवूया चला तर रूपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे


Dhokla Recipe In Marathi
Dhokla Recipe In Marathi



Dhokla Recipe In Marathi


 खमंग ढोकळा साठी लागणारे साहित्य : -

        तांदूळ                   २       वाटी
        चना डाळ              १     वाटी
        दही                      १/२    वाटी
        खायचा सोडा         १/२    चमच
        हिंग                      १/४    चमच
        हिरवी मिरची          ४/५
        मीठ स्वादनुसार
        तेल आवश्यक तेवढे

Dhokla Recipe 

पाककृती : -

एका बाऊलमध्ये २ वाटी तांदूळ, १ वाटी चनाडाळ मिक्स करा.

तांदूळ चनाडाळ २ ते ३ स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या ७ ते ८ तास भिजत घाला 'Dhokla Recipe In Marathi'

७ ते ८ तास भिजलेले तांदूळ चना डाळ २ वेळा स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या 

थोडा वेळ हवेशीर ठेवा त्यातील पाणी चा ओलसर पणा कमी होईल

 मिक्सर च्या पॉटमध्ये रवाळ वाटून घ्या कमी पाण्याचा वापर करा

Dhokla 

एका बाऊल मध्ये तयार झालेले मिश्रण घ्या त्यामध्ये दही मिक्स करा ७ ते ८ तास आंबण्यासाठी ठेवा

तांदूळ डाळचे आंबलेले मिश्रणमध्ये १ चमच तेल, १/२ चमच खायचा सोडा , १ /२ चमच पेक्षा कमी हिंग, 
१ / २ चमच हळद टाकून मिक्स करा

बाऊल मधील मिश्रण ला एका मोठ्या चमच च्या साह्याने एकाचं दिशेने फेटून घ्या काही वेळ तसेच झाकून ठेवा Dhokla Recipe In Marathi

गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी टाका पाण्याला उकळी येवू द्या 

कढई मध्ये जाळी स्टॅड किंवा एखादी छोटी प्लेट उलट अशी ठेवा 

गोल काठ असलेली मोठी प्लेट किंवा कढईच्या आत बसेल असं लहान ताट घ्या

प्लेट च्या आत मधील भागाला तेल लावा ढोकळा चे मिश्रण त्यात ओतुन घ्या

कढईत पाण्याला उकळी आली की प्लेट कढईत ठेवा वरुन झाकन ठेवा १० ते १५ मी. वाफू द्या

१० ते १५ मी नंतर झाकन उघडू घ्या चाकूच्या किंवा चमच ने ढोकळा ला टोचून पहा मिश्रण जर चिकटले नाही तर ढोकळा पूर्ण शिजला असे समजा

प्लेट बाहेर काढा थोडा वेळ थंड होवू द्या थंड झाल्यावर 
आपल्या आवडीनुसार लहान मोठया भागात कापून घ्या

छोटा पॅन गॅस वर मंद आचेवर ठेवा २ चमचे तेल गरम होवू द्या

गरम तेलमध्ये १/२ चमच मोहरी तुडतडू द्या त्यात ४/५ कडिपत्ता आणि बारिक कट केलेली हिरवी मिरची टाकून परतुन घ्या 

प्लेट मधील ढोकळा वर पॅन मधील सर्व साहित्य ने तडका द्या

ढोकळा सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी सोबत आनंद स्वाद घेवू शकतो

कोथिंबिर ,हिरवी मिरची, पदिनाची पाने, बारिक भूजिया सेव यांचे मिश्रण करुन मिस्कर पॉटमध्ये चटणी तयार करून घ्या निंबू चा रस आणि साखर टाका.

टोमॅटो सॉस सोबत सुध्दा स्वाद घेवू शकता


ढोकळा वेगवेगळया साहित्य वापरून तयार करता येतो जसे बेसन वापरून ढोकळा तयार होतो बेसन आणि रवा मिक्स करून ढोकळा तयार होतो 

"Dhokla Recipe In Marathi"

FAQs

ढोकळा किती वेळ वाफवायचा?
कढई मधील पाण्याला छान उकळी येवू द्या नंतर प्लेट कढई ठेवा आणि झाकण ठेवा १० ते १५ मी.वाफू द्या
म्हणजे ढोकळा व्यवस्थित होईल

ढोकळा कधी शिजला हे कसे कळते?
१० ते १५ मी . वाफायला ठेवा गॅस कमी करून कढईवरील झाकन उघडून घ्या प्लेट मधील ढोकळयाला चमच किंवा चाकू ने टोचून पहा चमचला मिश्रण चिकटले नाही तर ढोकळा शिजला समजा

रुपेरी रेसिपी मध्ये खमंग ढोकला या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

खमंग ढोकला या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 

रूपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल आपले मन पूर्वक धन्यवाद

माहिती आवडल्यास कृपया Comment करा Share आवश्यक करा.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने