Sabudana Khichdi Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये साबूदाना खिचडी कशी तयार करता येईल हे पाहू
आपण भारतीय लोक संस्कृतीचे फार जतण करतो आणि ते केलेचं पाहिजे कुठे श्रद्धा तर कुठे अंधश्रद्धा पण आहे
आठवडयातुन एक दिवस उपवास करणे आपल्या आरोग्या साठी चांगले आहे पण अतिशोक्ती व्हायला नको
चतुर्थी एकादशी असली की उपवास आणि इतरही देवी देवांच्या नावे उपवास केला जातो
उपवास असला तर फळे, भगर साबूदानाचे वडे, तळलेले बटाटे चिप्स किंवा पापड आणि बरेच काही असते
सर्वाना आवडणारी कमी वेळात कमी खर्चात तयार होणारी साबूदाना खिचडी आपण त्याला साबूदानाची उसळ ही म्हणतो
चला बघुया रूपेरी रेसिपीमध्ये उपवास स्पेशल साबूदाना खिचडी कशी तयार होते
![]() |
| Sabudana Khichdi Recipe Marathi |
Sabudana Khichdi Recipe Marathi
साबूदाना खिचडी साठी लागणारे साहित्य : -
साबूदाना 2 वाटी
शेंगदाने 1/2 वाटी
बटाटे 2
साखर 1 चमच
जिरे 1/2 चमच
तुप / तेल 3 चमच
लिंबू चा रस 1 चमच
हिरवी मिरची 4
कडीपत्ता 6
मीठ चवीनुसार
Sabudana Khichdi Recipe
पाककला : -
प्रथम एका बाऊल मध्ये 2 वाटी साबूदाना घ्या साबूदाना दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या
बाऊल मध्ये साबूदाना भिजेल तेवढे पाणी त्यात टाकून त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत ठेवा
2 बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि शिजवून घ्या किंवा कच्चे वापरत असाल तर साधारण बारिक चिरुन घ्या
4 ते 5 तास भिजलेला साबूदाना खिचडी साठी तयार आहे खिचडी तयार करण्याची तयारी करू 'Sabudana Khichdi Recipe Marathi'
गॅस वर पॅन ठेवून 1/2 वाटी शेंगदाने भाजुन घेवू शेंगदाने थोडे बाऊण झाले की पॅन मधून एका डिश मध्ये थंड होण्यासाठी काढून घेवू
शेंगदाने थंड झाले की हातावर घासुन त्याचे छिलटे काढून मिक्सर पॉटमध्ये शेंगदाने जाडसर फिरवून घेवू
Sabudana Khichdi
गॅस वर पॅन ठेवून त्यात 3 चमच तुप टाका तुप गरम झाले 1/2 चमच जिरे घाला जिरे तडतडले त्यात कडीपत्ता टाका नंतर बारिक चिरलेली हिरवी मिरची टाकून परतुन घ्या
कच्चे चिरलेले बटाटे किंवा शिजवून घेतलेले बटाटे अर्धवट मॅश करून पॅन मध्ये टाकून परतुन घ्या
भिजुन मुलायम झालेला साबूदाना पॅन मध्ये टाकून परतुन घ्या त्याने चवीनुसार मीठ घालून साबूदाना 5 मिनिट परतवत राहा त्यामुळे पॅनमध्ये चिकटणार नाही आणि कडक होणार नाही Sabudana Khichdi Recipe Marathi
शेंगदाने घाला छान परतुन घ्या लिंबूचा रस टाका किंवा 2 चमच दही टाका 1/2 चमच साखर घाला 10 मिनिट कमी ऑच वर झाकून ठेवून वाफू द्या
उपवास स्पेशल गरमगरम साबूदाना खिचडी तयार आहे
साबूदाना खिचडी सोबत फ्राय केलेले दही सोबत सर्व्ह करा आणि स्वाद घ्या
"Sabudana Khichdi Recipe Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये आपण साबूदाना खिचडी या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
साबूदाना खिचडी या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडल्यास निश्चित Comment करा आणि Share करायला विसरू नका
