मैसूर पाक रेसिपी मराठी Mysore Pak Recipe Marathi

Mysore Pak Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये मैसुर पाक कसा तयार करता येईल हे पाहू

आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य आहे पोशाख, राहणीमान, खाणपान वेगवेगळे आहे या विविधतेत एकता आहे व्यंजन तयार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे 

बेसना पासुन वेगवेगळे प्रकारचे व्यंजन तयार करता येते बेसन पासुन सेव, पापडी, बर्फी, बुंदी वगैरे बरेच खादय पदार्थ तयार करता येते 

कमी साहित्या मध्ये बेसना पासुन मैसुर पाक कसा तयार करता येईल

चला तर बघूया रूपेरी रेसिपी मध्ये स्वादिष्ठ मैसुर पाक कसा तयार करता येईल.

Mysore Pak Recipe Marathi
Mysore Pak Recipe Marathi


Mysore Pak Recipe Marathi

मैसुर पाक साठी लागणारे साहित्य : -


                              बेसन                   1   वाटी

                              साखर                  1   वाटी

                              तुप                      1   वाटी

                              तेल                     4    चमच

                              पाणी                   1/2 वाटी

                              खायचा सोडा        1/2 चमच

                              वेलची पावडर       1/2 चमच

Mysore Pak Recipe 

पाककला : =

गॅस वर छोटा पॅन ठेवा त्यामध्ये 1 वाटी तुप गरम होण्यासाठी ठेवा त्यात 4 चमच तेल मिक्स करा

दुसऱ्या गॅसवर मोठ्या पॅन मध्ये 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी टाकून पाक तयार करुया 1/2 चमच वेलची पावडर घाला

साखर ला चमचे ने एकसारखे ढवळत राहा साखर लवकर विरघळेल 'Mysore Pak Recipe Marathi'

पाक घट्ट झाला की चमच मध्ये घेवून हाताचा अंगठा व पहिले बोट यावर पाक तपासा पाक एक तारी झाला का पाहा

साखरेचा एक तारी पाक तयार झाला म्हणजे त्यात चना डाळ चे 1 वाटी बेसन टाकून एकसारखे परतवा

बेसन च्या गुठळ्या होणार नाही यासाठी बेसन एक सारखे परतवून एक जिव करून घ्या 2 मिनिटे शिजु द्या गॅस मंद करुन घ्या

Mysore Pak 

एक मोठा चमच ने तेल मिक्स केलेले गरम तुप पॅन मधील बेसन वर टाकून एकसारखे 2 ते 3 मिनिटे परतवा बेसन ने तुप शोसले की परत एक मोठया चमच ने गरम तुप टाका एकसारखे 2 ते 3 मिनिट परतवा

बेसन ने तुप शोसले की परत एक चमच तुप बेसन मध्ये टाका एकसारखे परतवा 

बेसन यावेळी तुप शोसणार नाही बेसन तुप बाहेर सोडणार बेसन मैसुर पाक साठी तयार झाले

बेसन घट्ट होण्यास सुरुवात झाली गॅस बंद करून बेसन परतवत राहा जास्त घट्ट होणार नाही यावर द्या मध्यम घट्ट बेसन होवू द्या Mysore Pak Recipe Marathi

1/2 चमच पेक्षा कमी खायचा सोडा घाला आणि परतवा बेसन छान जाळीदार होण्यास सुरुवात झाली तर मैसुर पाक छान तयार होईल

एका प्लेट ला आतमध्ये पूर्ण पणे तुप किंवा तेल लावून घ्या आणि पॅनमधील मैसुर पाक प्लेटमध्ये ओतुन प्लेट मध्ये पसरवून घ्या वरून हलकेसे प्लेन करून घ्या

मैसुर पाक थोडा कोमट झाला चाकूने वडया पाडून घ्या  

मैसुर पाक थंड झाला की एका ताट मध्ये मैसुर पाकची प्लेट उलट करुन मैसुर पाक काढून घ्या

सुंदर चव पाहण्यास आकर्षक असा मैसूर पाक तयार आहे

"Mysore Pak Recipe Marathi"

रुपेरी रेसिपी मध्ये आपण मैसुर पाक या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

मैसुर पाक या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 

रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद

माहिती आवडल्यास निश्चित Comment करा आणि Share करायला विसरू नका 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने