Chamcham Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये चमचम कशी तयार करता येईल हे पाहू
जेवण असो किंवा नास्ता या मध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी काहीतरी गोड असणं गरजेच असतं त्यामुळे जेवणाचा आणि नास्ताचा आनंद द्विगणीत होतो
पाहूण्यांना पावंचार पण गोड ची साथ मिळाली छान पावंचार होतो बाहेर मार्केट मधून गोड वस्तु आणण्या पेक्षा घरीच कमी वेळात कमी खर्चात तयार होत असेल तर फायदा होईल
मिठाईत प्रसिद्ध चमचम कशी आपणास तयार करता येईल याबद्दल आपण माहिती घेवूया
चला तर आपल्या आवडत्या रूपेरी रेसिपी ला भेट देवूया
![]() |
| Chamcham Recipe Marathi |
Chamcham Recipe Marathi
चमचम साठी लागणारी साहित्य : -
Chamcham Ingredients :-
दूध 1 लिटर
साखर 500 ग्रॅम
आरारोट 2 चमच
केसर 1 चमच
लिंबू 2
खवा 1 वाटी
वेलची पावडर 2 चमच
फुड कलर 1 चमच
Chamcham Recipe
पाककला : -
एक लिटर दुध पॅन मध्ये गरम होण्यासाठी ठेवा दुध ला उकळी आली की ग्रॅस बंद करा
2 लिंबू चा रस काढून एका वाटीत पाणी मध्ये मिक्स करून घ्या 'Chamcham Recipe Marathi'
दुध कोमट झाले की त्यामध्ये वाटीतील लिंबू पाणी थोडे थोडे दुध मध्ये टाका चमच ने हळूहळू फिरवा दूध फूटण्यास सुरुवात होईल
ग्रॅस बंद करून पॅन बाजुला ठेवा त्यात मध्ये साधे दोन ग्लास पाणी टाका त्यामुळे लिंबाच्या रसाचा आंबट पणा कमी होईल
फूटलेले दूध मधील पाणी वेगळे करण्यासाठी दूधला
गाळणी ने गाळून कॉटन कपडया मध्ये बांधून ठेवा
Chamcham
कपडया मधील तयार पनीर एका ताट मध्ये ठेवा त्यावर 2 चमचे आरारोट टाका हाताच्या मनगटाने पनीर छान हळूवाळ पने मॅश करुन एकजीव करुन घ्या
पनीर चे लहान गोळे तयार करून घेवू त्यानंतर त्या गोळ्याचे 3 ते 4 इंच चे लांब अंडाकार आकाराचे किंवा सिलेंडरच्या आकाराचे चमचम तयार करून घेऊ
चमचम साठी पाक तयार करू गॅस वर पॅन ठेवा त्यात 2 ग्लास पाणी उकळी येऊ द्या
नंतर पाण्यामध्ये 500 ग्रॅम साखर टाकून पाणी छान उकळू द्या 1/2 चमच वेलची पावडर घाला पाक आपल्याला 1 तारी 2 तारी तयार करायचा नाही साधारण घट्ट पाक तयार करायचा आहे
तयार केलेली चमचम पाकमध्ये हळूवाळ सोडू 10 मि उकळू देवू त्यानंतर हलकेसे चमच च्या साह्याने पलटवून घेवू पॅनवर झाकण ठेवून 25 ते 30 मिनिटे चमचम पाकमध्ये शिजवा नंतर ग्रॅस बंद करा
खवा थंड झाल्यावर ताट मध्ये घेऊन मळून घेवू एक जीव करून घेवू
थंड झालेल्या चमचम पाकातुन एका डिश मध्ये काढून घेऊ चमचम ला मध्यभागातुन चाकूने अर्धवट कट करून त्यात खवा भरून चमचम बंद करा
बारिक चिरलेला पिस्ता आणि बदाम चे काप करुन चमचम मधील खव्यावर लावा
केसर ओला करून त्याचा टिका चमचम ला लावा आवडत असल्यास खोबरा किस पण लावू शकता
सुंदर दिसणारी जेवणामध्ये गोडवा निर्माण करणारी चमचम आपली तयार आहे
![]() |
| Chamcham Recipe Marathi |
"Chamcham Recipe Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये आपण चमचम या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला
Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
चमचम या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
टिप : -
चमचम तयार करतांना तुम्हाला आवडत असेल तो रंग वापरता येतो
चमचम ला स्टपिंग करतांना पुर्ण पणे थंड करुन घ्यावे
चमचम दोन तीन प्रकारे तयार करता येईल खवा भरून स्टपिंग करू शकतो किंवा चमचम कट न करता खोबरा किस वरून स्टपिंग करुन बदाम, पिस्ता ने डेकोरेट करू शकतो






