No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये कच्ची दाबेली कशी तयार करता येईल हे पाहू
सेव, डाळिंबाचे दाने, कोथिंबिर, ने शिंगार करून आपले मन मोहणारी, आकर्षित करून घेणारी आहे
रस्त्याच्या कडेला हातगाडीवर,चायनीज गाडीवर, हॉटेलमध्ये ही मिळणारी कमी खर्चात परवडणारी कच्ची दाबेली होते तरी तयार कशी चला माहिती घेऊ या रूपेरी रेसिपीमध्ये.
![]() |
| No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi |
दाबेली साठी लागणारे साहित्य : -
बटाटे 4
पाव 6
कांदा 1
दाबेली मसाला 3 चमचे
मसाला शेंगदाने 1/2 वाटी
डाळींबाचे दाने 1/2 वाटी
बटर 2 चमचे
बारिक शेव 1/2 वाटी
गोड चटणी 1/2 वाटी
तिखट चटणी 1/2 वाटी
तेल 1 चमच
मीठ चवीनुसार
कोथिंबिर
Kacchi Dabeli Recipe
पाककला : -
बटाटे 2 पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या आणि कूकर ला 2 ते 3 शिट्टी होऊ द्या
कुकर थंड झाल्यावर बटाटे बाहेर काढून घ्या त्याचे साल काढून काही वेळ थंड होण्यासाठी ठेवा
गॅसवर कढई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवा तेल गरम झाले की त्यात जिरे तडतुडू द्या 'No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi'
त्यानंतर त्यात हिंग,दाबेली मसाला, टाकून परतुन घ्या
शिजलेले बटाटे मॅश करुन घ्या आणि कढईत टाकून तयार मसाला मध्ये छान परतुन घ्या चवीनुसार मीठ टाका मिक्स करून घ्या
मसाला घट्ट झाला असेल तर 1 चमच पाणी टाकून परतुन घ्या पेस्ट सारखा होईल
Kacchi Dabeli
एका बाऊल मध्ये तयार बटाटा मसाला टाका त्यावर बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाने, मसाला शेंगदाने, खोबरा किस, बारिक चिरलेली कोथिंबिर टाका
पाव ला सुरिच्या ( चाकू )साहयाने अर्धवट कापून घ्या आणि पावला उघडा पावच्या आतमध्ये वरच्या बाजुला तिखट लाल चटणी लावा
पावच्या आतमध्ये खालच्या बाजुला गोड चटणी लावा मध्य भागामध्ये बटाटा मसाला घाला त्यावर मसाला शेंगदाने आणि डाळिंबाचे दाने ठेवा
त्यानंतर बारिक शेव त्याच्या आत आणि बाहेर बाजुला लावा No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi
गॅसवर पॅन गरम करुन त्यावर बटर टाका आणि पावला सर्व बाजुने शेकून (भाजुन ) घ्या
एका डिशमध्ये तयार दाबेली डाळिंबाचे दाने, मसाला शेंगदाने घ्या कोथिंबिर ने सजवा आणि सर्व्ह करा
![]() |
| No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi |
"No.1 Kacchi Dabeli Recipe In Marathi"

