Patta Cabbage Manchurian Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये झणझणीत स्वादिष्ठ पत्ता कोबी मंचुरियन तयार करता येईल हे पाहू
भारतीय लोकांना विशेषत: महाराष्ट्रीयन झणझणीत चमचमीत खाण्याचा स्वाद घेण्यासाठी आतुर असतात तिखट असो की आंबट गोड पण स्वाद घेवून चं समाधान होत
त्यात मंचुरियन नाव ऐकलं तर काही नवीन वाटतं मंचुरियन डिश चायनिज जरी असलील तरी ती आता
भारतीय डिश झाली असे म्हटलं तरी काही वावगं नाही.
मंचुरियन डिश लहान मुलांना आणि मोठया व्यक्तिला ही आवडेल अशी आहे हॉटेल असो की रेस्टॉरंट चायनिजस्टॉल हातगाडी आणि विवाह सोहळा, वाढदिवस, इतरही कार्यक्रमामध्ये मंचुरियन डिश असतेचं मंचुरियन ग्रेव्ही आणि मंचुरियन ड्राय अशा दोन पध्दतीने तयार करता येईल.
मंचुरियन ग्रेव्ही ला भाजीसारखं पण खाऊ शकतो किवा तसेही खाऊ शकतो मंचुरियन ड्राय ला नुडल्स किंवा फ्राईड राईस सोबत पण खाऊ शकतो.
तर चला जावूया रूपेरी रेसिपी मध्ये झणझणीत कोबी मंचुरियन ची माहिती घ्यायला.
Patta Cabbage Manchurian Recipe Marathi
मंचुरियन साठी लागणारे साहित्य :-
कोबी 250 ग्रॅमगाजर 2शिमला मिरची 2कांदा 1मक्याचे पीठ 100 ग्रॅमतांदूळ पीठ 100 ग्रॅमहिरवी मिरची 2
लसण अद्रक पेस्ट
लाल रंग ( आवश्यक असल्यास )
Patta Cabbage Manchurian Recipe
पाककला : -
कोबीला बारीक चिरून घ्या शिमला मिरची चिरून घ्या गाजर बारीक चिरून किंवा किसुन घ्या.
- एका बाऊलमध्ये कोबी, शिमला मिरची, गाजर बारीक किसलेले यात थोडे मीठ ऍड करा.
- १० मिनिटे झाकून ठेवा त्याला पाणी सुटेल १० मि नंतर हाताने प्रेस करून पाणी काढून घ्या 'Patta Cabbage Manchurian Recipe Marathi,'
Patta Cabbage Manchurian
- कोरडया भाज्या एका बाऊलमध्ये घ्या
- त्यात काळी मिरी पावडर हिरवी मिरची तांदळाचे पीठ मक्याचे पीठ घ्या
- सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
- त्यात हळद , लसूण आलं पेस्ट, लाल मिरची पावडर, सोयासॉस, कोथिंबीर, बारिक चिरलेला कांदा घ्या
- चांगले मिश्रण तयार करून घ्या
- लाल रंग पण घेऊ शकता .
- आता हाताने मळून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या.
मंचुरियनचे गोळे तळण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवा त्यात आवश्यकतेनुसार तेल घ्या

तेल गरम झाले की मंद आचेवर गॅस करा गोळे तपकिरी होत पर्यंत तळून घ्या.
डिश वर टिशु पेपर ठेवा त्यावर तळलेले मंचुरियन ठेवा.
मंचुरियन ग्रेव्ही तयार करण्याची विधी
साहित्य : -
टोमॅटो सॉस 1 चमचा
लाल चिली सॉस 1 चमचा
व्हिनेगर छोटा 1 चमचा
ग्रिन चिली सॉस 1 चमचा
कांदा चिरलेला 1
हिरवी मिरची चिरलेली 3 / 4
शिमला मिरची चिरलेली 1
अद्रक बारिक चिरलेलं 1 इंच
लसन कळी चिरलेली 4 / 5
धने भाजलेले 1 चमचा
मिरे पावडर छोटा 1 चमचा
लसण अद्रक पेस्ट 1 चमचा
साखर छोटा 1 चमचा
मक्का पिठ 3 चमचे
मसाला 1 चमचा
तेल 2 चमचे
मिठ स्वाद नुसार
पाणी 1 कप
कोथिंबिर
पाककृती : -
पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा

त्यानंतर भाजलेले धने आणि मसाले टाका शिमला मिरची, मिरे पावडर त्यात 1 चमचा चिलीसॉस, 2 चमचे टोमॅटोसॉस, 2चमचे सोयासॉस, 1 चमच व्हिनेगर टाका.

एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ आणि थोडं पाणी घेऊन पेस्ट तयार करा.
पाच दहा मिनिटे मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजू द्या

रुपेरी रेसिपी मध्ये आपण पत्ता कोबी मंचुरियन या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
पत्ता कोबी मंचुरियन या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
महत्त्वाचे👇
- पत्ता कोबी मध्ये फॉस्फरस ,लोह , कॅलिशयम जिवनसत्व ' क ' जास्त प्रमाणत असते. रोजच्या आहारात पत्ता कोबी चा समावेश करावा पचन क्रियेसाठी पत्ता कोबी फायदेशिर आहे .
- गाजर मध्ये कॅलरिज 41, प्रोटिन o.9 ग्रॅम, साखर 4.7 ग्रॅम, फायबर्स 2.8 ग्रॅम कार्बोहायड्रेट 9.6 फॅट 0.2 ग्रॅम , पाणी 88% असते.
- कांदा खाने मधूमेह असणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे रोगप्रतिकार शक्ती तसेच पचनसंस्था सुधारण्यासाठी महत्वाचा आहे कांदयामध्ये सेलेनियम असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
रूपेरी रेसिपी भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद
माहिती आवडल्यास Comment करा आणि Share करा














